Type Here to Get Search Results !

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात बॅ.ए.आर.अंतुले यांची जयंती साजरी

 मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात बॅ.ए.आर.अंतुले यांची जयंती साजरी 

कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

  वसंतराव नाईक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विश्वास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सिडको चे माजी संचालक आर.सी.घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य वासंती उमरोटकर, ॲड.इस्माईल घोले, डॉ.एम.ए.कोकाटे, रियाज ढाकम, किसन बळी, उद्धव मुंबईकर,ताविज ढाकम, प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.एन.एन.बागूल,प्रा.डॉ.सिमा नाहिद,प्रा.डॉ.सुभाष म्हात्रे,प्रा.डॉ.मुरलीधर गायकवाड,प्रा.चिंतन पोतदार,प्रा.सिद्धेश सतविडकर,प्रा.मुस्कान रज्जाब, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.सुरुवातीला बॅ.ए.आर.अंतुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी मान्यवरांनी बॅ.ए.आर.अंतुले यांच्याबद्दल आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी वकृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांनी केले.सुत्रसंचालन प्रा.डॉ.सुभाष म्हात्रे यांनी तर प्रा.डॉ.मुरलीधर गायकवाड यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर