कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने आणि शिवसंग्राम संघटनेचे सर्वेसर्वा, संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर व सर्व बहुजन समाजाच्या सर्वांगीण न्यायहक्कांसाठी जीवनाच्या अखेरपर्यंत लढा उभारणारे पुरोगामी महाराष्ट्रातील एक सर्वमान्य लोकनेता, राज्यातील सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात आपली आगळीवेगळी छाप पाडणारा एक झुंजार नेतृत्व स्व.आमदार विनायकराव मेटेसाहेब ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रायगड जिल्हा शिवसंग्रामतर्फे गोरेगाव येथे रविवार १६ फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबिर आणि मोफत औषधे वाटप कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत ह्यांनी दिली आहे.
नवी मुंबई, सानपाडा येथील नामांकित आणि सुप्रसिध्द्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ.आर. एन. पाटील सुरज हॉस्पिटल ह्यांच्या विशेष सहकार्याने आणि रोटरी क्लब ऑफ गोरेगाव, ग्रामपंचायत गोरेगाव, सकल मराठा समाज गोरेगाव लोणेरे विभाग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असलेल्या ह्या शिबिरात विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यांत येणार आहे तसेच ह्या शिबिरांमध्ये डॉ. आर. एन. पाटील (मेंदू व मणका विकार तज्ञ), डॉ. उदय पाटील (हृदयविकार तज्ञ), डॉ. अंजली आर. पाटील (मनोविकार तज्ञ), डॉ. रमा पाटील (मज्जातंतु
विकार तज्ञ) हे स्वतः रुग्णांची तपासणी आणि योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. ऑडिओमेट्री तपासणीबरोबरच इतर प्राथमिक तपासण्या, ऑरथोपेडिक, हृदयविकार, मानसिक विकार, मणक्याचे आजार, मेंदूचे आजार, एक्ससरे तपासणी, ह्यांसाहित अनेक प्रकारच्या आजारांवर निदान ह्या मोफत आरोग्यशिबिरामध्ये केले जाणार असून रुग्णांना योग्य ती औषधेही मोफत मिळणार आहेत.रविवार १६ रोजी संबोधी बुद्धविहार गोरेगाव येथे संपन्न होत असलेल्या ह्या शिबिरामध्ये अनेक नामंकीत उपस्थित राहणार आहेत.
शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.ज्योतीताई मेटे, जिल्हा कार्याध्यक्ष शंकरराव थोरवे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील सत्वे, गोरेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय सुर्वेसाहेब, सरपंच जुबेरभाई अब्बासी, गोरेगाव रोटरी क्लब अध्यक्ष तुषार पटेल, सचिव प्रीतम गांधी, सीनियर सदस्य हितेश शहा, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गोरेगावकर, पंचशील सेवा संघ अध्यक्ष विकासदादा गायकवाड, सकल मराठा समाज अध्यक्ष ऋषिकेश भोसले ह्यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर ह्या शिबिरास हजर राहणार आहेत.
शिवसंग्रामच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब, गरजू, विविध आजारांनी त्रस्त असलेल्या परंतु पैशाअभावी योग्य ते उपचार घेऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठीसुद्धा योग्य त्या औषधांसहित ह्या मोफत आरोग्यशिबिराचे आयोजन केलेले असल्याचेही अविनाश सावंत ह्यांनी म्हटले आहे.
ह्या मोफत आरोग्य शिबिराचे जवळपासच्या सर्व नागरीकांनी जास्तीत जास्त फायदा घेवून आपापल्या विभागांमध्ये विविध सामाजिक संस्था, ग्रामपंचायती, युवकमंडळे, महिलामंडळे ह्यांनी सहभागी होऊन आरोग्याशी निगडीत असलेल्या ह्या एका महत्वाच्या उपक्रमास सहकार्य करावे.असे आवाहनही शिवसंग्राम रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत ह्यांनी केले
आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या