मुरुड तालुका पंचायत समितीतर्फे क्रीडा स्पर्धकांना टी शर्टचे वाटप
कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)मुरुड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांच्या विनंतीवरून जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत टी शर्ट वाटप करण्यात आले.सदरचे टी शर्ट हे लायन्स क्लब ऑफ मुरुड व सरपंच संतोष राणे ग्रामपंचायत काशिद यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, विस्तार अधिकारी नरेंद्र गुरव,लायन्स क्लब मुरुड जंजिरा ला. मकरंद कर्णिक,ला. सनी सोगावकर,ला.नैनिता नयन कर्णिक,ला.स्मिता मुरंजन, सहभागी स्पर्धक, सर्व केंद्र प्रमुख, सर्व साधन व्यक्ती उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या