साळावमध्ये श्रीसंत रोहिदास जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील साळावमध्ये संत रोहिदास नवतरुण मंडळातर्फे श्रीसंत रोहिदास जयंती यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
तळा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. श्री. शिवाजी वाघ, रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक म्हशिलकर, सरपंच वैभव कांबळी, उपसरपंच दिनेश बापलेकर, सदस्य दत्ता पाटील, शितल वाणी, अंकिता कांबळी,सन्मित्र वाहतूक संघटना उपाध्यक्ष सय्यद खान, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मयेकर,प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका अपेक्षा म्हात्रे,श्रीसंत रोहिदास नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश नागोठणेकर, उपाध्यक्ष कृष्णा वाडेकर, सचिव संदीप नागोठणेकर,खजिनदार विजय नागोठणेकर, कार्याध्यक्ष जगदीश वाडेकर,सह कार्याध्यक्ष आकाश नागोटकर, सल्लागार प्रमोद नागोठणेकर, सदस्य विकास नागोटकर,संजय वाडेकर,अविनाश वाडेकर,अनंत वाडेकर,धर्मेंद्र नागोटकर शंकर नागोटकर,शांताराम नागोटकर,दिपक नागोटकर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.शिवाजी वाघ व दिपक म्हशीलकर, गणेश नागोठणेकर, दिनेश बापलेकर यांच्याहस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, श्रीसंत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, पदवीधर विदयार्थी व सेवा निवृत्त, आदर्श पुरस्कृत, शासकिय कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह,शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.७ वी.तील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षिस देऊन गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संत रोहिदास नवतरुण मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा वाडेकर यांनी मानले.
_______________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या