फणसाड-सुपेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : रस्ता दुरुस्त केव्हा होणार ? प्रवासी व वाहनचालकांचा सवाल
कोर्लई,ता.१५ (राजीव नेवासेकर)मुरुड-रोहा प्रवासात जवळचा मार्ग (शाॅर्टकट) असलेल्या मुरुड तालुक्यातील फणसाड-सुपेगांव मार्गावर काही ठिकाणी आदिवासी वाडी सुमरादेवी ते सुपेगावच्या पुढील अवघड वळणापर्यंत अनेक ठिकाणी मागील पावसाळ्या पासून खाच-खळगे व खड्डे पडलेले असल्याने अपघाताला आमंत्रण ठरत असून याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबाबत नाराजी व्यक्त होत असून साईडपट्ट्या देखील साफ करण्याची मागणी केली जात असून रस्ता दुरुस्त केव्हा होणार ? असा सवाल प्रवासी व वाहनचालकांकडून विचारला जात आहे.
गेले कित्येक वर्षे हा सुपेगाव मार्गावर रस्ता न बनविल्याने अद्याप खड्ड्यातच आहे.मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी रोहा सुपेगांव मार्गे मुरुड रस्ता जवळचा असल्याने या रस्त्यावर वाहनांची वाढती वर्दळ असते. गेले कित्येक वर्षापासून या रस्त्यावर ब-याच ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य असून वाहन चालकांना आपली वाहने चालवताना कसरत करावी लागते आहे. खड्यांच्या साम्राज्यामुळे या रस्त्यावर वेळप्रसंगी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने यात लक्ष पुरवून सुपेगांव मार्गावर रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्यात योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून जोर धरीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या