मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन
कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त दि.२७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे मोबाईल हातात घेऊन जगाशी संवाद साधणाऱ्या तरुण पिढीकडून मराठी भाषेच्या फार मोठया आपेक्षा आहेत. तरुण पिढी संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. SMS ट्विटर, फेसबूक यांच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी ही पिढी मोठया प्रमाणात मराठीचा वापर करतांना दिसते.आपल्या राज्यात मराठी पोरकी झाल्याचं चित्र उभे केले जात आहे ते नेमके खरे नाही असे मला वाटते. राजभाषा असलेल्या मराठीला आणखी वैभव मिळण्यासाठी शासन सर्व तो परी प्रयत्न करीत आहे .असल्याचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येकांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. वाढवला पाहिजे मराठी भाषा बोलणं. ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांनी लक्षात घेतल पाहिजे. सर्वांनी आपली दैनंदिन व्यवहार मराठी भाषेत करण्याचा दृढ संकल्प करुया असे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे यांनी यावेळी सांगितले.
वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.एस.एल.म्हात्रे,प्रा.डॉ.एन.एन.बागूल,प्रा.डॉ.मुरलीधर गायकवाड,प्रा.डॉ.सिमा नाहिद,प्रा.गजानन मुनेश्वर,प्रा.प्रणव बागवे,प्रा.चिंतन पोतदार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या