सर्वे येथील शिवमंदिरात महाशिवरात्र उत्साहात
कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर)- मुरुड तालुक्यातील प्राचीन पांडवकालीन प्रसिद्ध असलेल्या काशिद ग्रामपंचायत हद्दीत सर्वे येथील कावड्याच्या डोंगरावर वसलेल्या सर्वेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली. यादिवशी सकाळी शिवपिंडीची विधिवत पूजा-अर्चा, आरती करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रम श्री शिवलीलामृत ग्रंथ वाचन, भाविकांसाठी सुश्राव्य बहारदार भजन घेण्यात आले. निसर्गरम्य परिसरात अथांग समद्रकिनारा लाभलेल्या कावड्याच्या डोंगरावरील प्रसिद्ध शिवमंदिरात मुंबई, प्रसिद्ध पुणे यांसह जिल्ह्यातील, तालुक्यातील व परिसरातील शिवभक्तांनी शिवपिंडी दर्शन घेऊन पूजाअर्चा करून महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वे ग्रामस्थ व महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. काशिद बीच पर्यटनात सर्वे येथील ऐतिहासिक पांडवकालीन डोंगरावर कावड्याच्या असलेल्या शिवमंदिराला अनन्य साधारण महत्व असून याठिकाणी पर्यटक व भाविकांसाठी विविध वीज, पाणी, रस्ता सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी दानशूर भाविकांनी आपले योगदान द्यावे तसेच शासनाने याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे श्री सर्वेश्वर मंदिर तालुक्यातील सर्वे येथील डोंगरावर निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेले हे देवस्थान धार्मिक पर्यटक स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला सर्वे गावच्या वतीने येथे उत्सव आयोजित केला जातो. या देवस्थानच्या रस्ता, पाणी, वीज आदी. विविध समस्यांकडे सामाजिक सेवा संस्था, लक्ष देवून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तर हे देवस्थान म हाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक पर्यटक स्थळ होईल व येथील स्थानिकांना रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होईल, असे काशिद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुशील खोपकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
(फोटो घेणे)
_______________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या