मुरुड तालुका कृषी विभागातर्फे भोईघर येथे किड रोग नियंत्रण विषयक कार्यक्रम
कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर येथील ग्रामपंचायत सभागृहात कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुपारी व आंबा किडरोग नियंत्रण विषयक माहितीपर कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र, रोहा येथील जीवन आरेकर यांनी आंब्यावरील कीड व रोग नियंत्रण याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन येथील सिध्देश सावंत यांनी सुपारी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.भोईघर ग्रामपंचायतीचे सरपंच हर्षद महाडीक, उपसरपंच प्रसाद चौलकर,प्रगतशील सुपारी व आंबा बागायतदार शेतकरी बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व रूपरेषा मंडळ कृषी अधिकारी प्रमोद नरळे यांनी केली.यावेळी काते यांच्या सुपारी बागेत प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेट देण्यात आली. कृषी पर्यवेक्षक रविंद्र सैंदाणे,कृषी सहाय्यक आदिराज चौलकर व कृषी सहाय्यक मनोज कदम यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले. कृषि सहाय्यक अतुल उपाध्ये यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या