मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे प्राचार्य डॉ. जे. के. कांबळे यांचा सत्कार
कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्रा.डॉ.जे.के.कांबळे यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संशोधक राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ व तमाम बौद्ध समाजाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थानिक तालुका समिती सचिव धर्मेश मोरे, स्मारक समिती सचिव मंगेश येलवे, शाखा क्र.2 चे अध्यक्ष नरेंद्र जाधव व सचिव मोनीश तांबे, सदस्य- संजय तांबे, गणेश तांबे,धर्मा जाधव,संस्थेचे कार्यकर्ते व सदस्य तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून मुरुड तालुक्यातील बौद्ध समाज व संस्थेला विविध सामाजिक कार्यात प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांचे सातत्याने सहकार्य व मार्गदर्शन करीत असून योगदान लाभत असल्याबद्दल समाजातर्फे यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या