लोणावळ्यातील मायक्रो सिल्व्हर जुबली ट्रॅाफी अंन्डर फोर्टीनच्या
कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) लोणावळा येथे येसाळ बोरी मैदानावर मायक्रो सिल्व्हर जुबली अंडर फोर्टिनच्या झालेल्या ४५ षटकांच्या क्रिकेट सामन्यात मुरुड तालुक्यातील मजगांव चा नचिकेत बुल्लू सामनावीर ठरल्याने क्रिकेट प्रेमींकडून कौतुक व समाधान व्यक्त केले जात आहे !
लोणावळा येथील बोरी मैदानावर सुरू असलेल्या मायक्रो सिल्वर जुबली ट्रॉफी अन्डर फोर्टिन (१४ वर्षांखालील)स्पर्धेत दिशा क्रिकेट ॲकॅडमी रायगड विरुद्ध अनबिटेबल क्रिकेट ॲकॅडमी (बदलापुर) सामन्यात दिशा क्रिकेट ॲकॅडमी(रायगड )ने दोन गडी राखून विजय संपादन केला.
दिशा ॲकॅडमी रायगड संघाकडून खेळताना मुरुडच्या नाचिकेत बुल्लूने ५ विकेट घेऊन सामनावीर ठरला ! या सामन्यात पियुष इंदलकर याने ४१(४४), आर्यन बंडगर २६(१९), आकाश चौधरी ८(२७), अलंकार जाधव ६३(४२) अशा धावा काढून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली !
अनबिटेबल क्रिकेट ॲकॅडमी बदलापूर संघाने आपल्या डावात २०५ धावांचे आव्हान दिशा क्रिकेट ॲकॅडमी रायगड ला दिले होते,दिशा क्रिकेट ॲकॅडमी रायगडने ते ३३.१ षटकात पूर्ण केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या