Type Here to Get Search Results !

मुरुड समुद्रकिनारी आढळणारी मृत कासवे : चिंतेचा विषय - प्राणी मित्रांकडून हळहळ व्यक्त

 मुरुड समुद्रकिनारी आढळणारी मृत कासवे : चिंतेचा विषय : प्राणी मित्रांकडून हळहळ व्यक्त

कोर्लई,ता.२६(राजीवनेवासेकर) मुरुड,एकदरा,राजपुरी आगरदांडा तसेच श्रीवर्धन दिघी समुद्रकिनारी मृत कासवे व डॉल्फिन मासे आढळून येण्याच्या प्रकाराने प्राणी मित्रांकडून हळहळ व चिंता व्यक्त केली जात असून यावर योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

   मुरुडच्या समुद्रकिनारी नुकतेच रविवारी ग्रीन टर्टल जातीचे मृत कासव वाहून आले.जहाजांच्या धडकेने, पंख्यात अडकून कासवाचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मृत कासवाला कावळा -कुत्र्यापासून तसेच आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन, आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरु नये म्हणून येथील सर्पमित्र व प्राणीमित्र संदीप घरत यांनी तातडीने दखल घेऊन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे व वनपाल संतोष रेवणे यांच्या सहकार्याने समुद्रकिनारी खड्डा करून दफन करण्यात आले.समुद्रकिनारी मोठमोठे कासव व डॉल्फिन मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडत असतात,अशावेळी आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित नगरपालिका व वनखात्याने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे असे मत सर्पमित्र संदीप घरत यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर