मुरुड -जंजिरा :ता.२५ जिल्हा परिषद रायगड यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळेच्या जिल्हास्तरीय क्रीडा व व्यक्तीमत्व विकास स्पर्धा या रायगड जिल्हा परिषद शाळा - वडगाव ,खालापूर येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत प्राथमिक शाळा बेलीवाडी आदिवासी वाडी केंद्र : नांदगाव ता.मुरुड येथील इयत्ता 2रीची विद्यार्थिनी गार्गी जितेश मेंगाळ हिने १ते ५ गटात मातीकामामध्ये रायगड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला.
गार्गी मेंगाळ हिला रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्या यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले गार्गी मेंगाळ या विद्यार्थिनीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यावेळी शिक्षिका - श्रीमती सुलभा कातवारे, श्री रुपेश बांद्रे ,श्री हेमंत नांदगावकर ,श्री जयवंत देडगे ,श्रीमती पूजा तोतडे, श्री भास्कर सालावकर, पालक श्री जितेश जयवंत मेंगाळ आदि उपस्थित हो
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या