अनिल पुलेकर यांचा जीवन आनंद संस्थेतर्फे सन्मान
कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबई विरार गोवा येथे सामाजिक सेवेत कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते अनिल पुलेकर यांचा मुरुडमध्ये नुकताच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
रस्त्यावरील निराधार बांधवांना त्यांच्या जीवनातील आनंद परत मिळवून देण्यासाठी संदीप परब यांची जीवन आनंद संस्था गेली पंधरा वर्षे मुंबई,विरार, गोवा येथे कार्यरत आहेत.त्या संस्थेत अल्प वेतनावर सामाजिक बांधिलकी म्हणून महिला व पुरुष कर्मचारी सेवा देत आहेत.अशा कर्मचाऱ्यांना विरंगुळा म्हणून शनिवार दि.२२ रविवार दि.२३ फेब्रुवारी दोन दिवसीय सहल मुरुड जंजिरा येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी ठाण्यातील वास्तव्यास असलेल्या व मुरुड जंजिरा येथील मूळ रहिवासी,ज्येष्ठ समाजसेवक अनिल पुलेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या राहण्याची व भोजनाची विनामूल्य व्यवस्था उपलब्ध करून दिली.
अनिल पुलेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आनंद संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त नरेश चव्हाण, प्रज्ञा राणे, सचिव किसन चौवरे, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या