संजय गुंजाळ सर्वद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
कोर्लई,ता.२३(राजीव नेवासेकर)कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुरुड तालुका अध्यक्ष,प्रियदर्शनी फाऊंडेशनतर्फे पंडित नेहरू समाजरत्न पुरस्कार प्राप्त मुरुड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक संजय पांडुरंग गुंजाळ यांना मुंबईच्या सर्वद फाऊंडेशनचा सर्वद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे !
सर्वद फाऊंडेशन मुंबई, महाराष्ट्र या संस्थेचा जीवनगौरव व कवी कुसुमाग्रज पुरस्कार सोहळा शनिवार दि. १८ जानेवारी २०२५ रोजी अभय इंटरनॅशनल स्कूल, विक्रोळी या ठिकाणी संपन्न झाला.यावेळी दिनानाथ वर्तक (मरणोत्तर), संजय गुंजाळ, रविकिरण पराडकर, डॉ. मिलिंद भोसुरे, अरुण देशपांडे यांना सर्वद जीवनगौरव २०२५ या पुरस्कारांनी व मान्यवर लेखकांना कवी कुसुमाग्रज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद देवेंद्र खन्ना (सुप्रसिद्ध पत्रकार) आणि प्रमुख अतिथीपद डॉ. प्रशंसा राऊत - दळवी, पुनम चांदोरकर यांनी भूषवले होते.
कला, साहित्य,सांस्कृतिक क्षेत्रातील संजय गुंजाळ यांचे कार्य उल्लेखनीय असून गेली वर्षे कलासागर नाट्य संस्थेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी राष्ट्रीय एकात्मता राखण्याचे यशस्वी काम केले आहे. सन २०११ चा ‘ॐ नम:शिवाय प्रतिष्ठान’चा ‘बाळशास्त्री जांभेकर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार, सन.२०१०चा रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनचा ‘सांस्कृतिक व कला पुरस्कार’ मिळाला आहे. शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्य राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
मुरुड नगरपरिषदेचे सलग पाच वेळा असे २५ वर्षे नगरसेवक पद ,१५ वर्षे शिक्षण ,कला, क्रिडा, सांस्कृतिक सभापतीपदी,मुरुड तालुका सुपारी संघ लि. चेअरमन, मुरुड ता. सुपारी संघ नियंत्रण मंडळ अध्यक्षपद ,मुरुड ता-एज्युकेशन सोसायटी संचलित पायोनियर इंग्लिश स्कूल चेअरमनपद, रायगड जिल्हा कोमसाप अध्यक्ष, म. फुले नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष, मुरुड माळी समाज अध्यक्ष ,'कलासागर नाट्यसंस्था मुरुड जंजिरा अध्यक्ष पदी,मुरुड तालुका समन्वय समिती अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे काम केले आहे.मराठी नाटक, मालिका (सिरियल) तसेच बारामती येथील माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या संस्थेकडून सन.२०१८ चा जीवनगौरव पुरस्कार,मराठी नाटक, मालिका (सिरियल), मराठी चित्रपटात अभिनय,२५ वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी अनेक संस्थांकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.
कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या सामाजिक सेवेची पोच पावती संजय गुंजाळ यांना सर्वद फाऊंडेशनचा सर्वद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या