Type Here to Get Search Results !

कांदळवनवरील बेकायदा भराव काढून गावाला वाचवा,ग्रामस्थ महिलांचा आक्रोश

 कोलमांडल्यात बेकायदा कांदळवने तोडून भराव : अधिकारी वर्गाने ग्रामस्थांसह केली स्थळ पाहाणी 

  * कांदळवनवरील बेकायदा भराव काढून गावाला वाचवा,ग्रामस्थ महिलांचा आक्रोश 

कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोलमांडला येथे खारफुटीवर मातीचा बेकायदा भराव टाकून कांदळवने कायमची नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणी धनदांडगे यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी बोर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना संजय जायपाटील यांनी विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकण, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे केली होती. त्याचवेळी कारवाई न केल्यास मोर्चा काढू, असा इशाराही देण्यात आला होता.याबाबतचे वृत्त ही वृत्तपत्रातून देण्यात आले होते.

     मुरुड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तुषार काकडे, कांदळवन कक्ष दक्षिण कोकण वनपाल अशोक शिंदे, प्रादेशिक वनविभागाचे वनपाल वैभव शिंदे, वनरक्षक पृथ्वीराज चव्हाण,बॉम्बे इन्व्हरमेंटल ॲक्शन ग्रुपचे प्रकल्प अधिकारी अनिल पंडित,पोलिस अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन स्थळ पाहाणी केली.यावेळी सरपंच सपना जायपाटील, स्थानिक ग्रामस्थ अजय भोईर ग्रामस्थ महिला संख्येने उपस्थित होत्या.

   या कांदळवनामधील क्षेत्रामध्ये बोर्ली कोळी व आदिवासी समाज बांधव खेकडे, चिंबोरे पकडून तसेच कालवे काढून,निवट्या पकडून उदरनिर्वाह करीत आहेत.असे असताना धनदांडगे याठिकाणी बेकायदा माती भराव टाकून कांदळवने नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.यामुळे आगरी, कोळी, आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ येणार असून सदर ठिकाणी भरावामुळे पावसाळ्यात पाण्याचा मुळप्रवाह अडून बोर्ली गावात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरुन संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन याठिकाणी कांदळवनाची तोड करून टाकण्यात आलेला भराव काढून टाकावा व पावसाळ्यामध्ये नदीचा प्रवाह ,खाडीचा प्रवाह ,समुद्राचा प्रवाह एकत्र येऊन बोर्ली गावातील कोळी बांधवांच्या मच्छीमार बोटींना धोका निर्माण होणार आहे.या संभाव्य पुराच्या धोक्यापासून वाचवावे.अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला जन आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.असे प्रथम नागरिक सरपंच सपना जायपाटील यांनी सांगितले.

  सकृतदर्शनी याठिकाणी भराव टाकण्यात आला असल्याचे दिसून येत असून केलेल्या तक्रारीनुसार पाहाणी केली असून वरीष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल.असे कांदळवन कक्ष दक्षिण कोकणचे वनपाल संजय जाधव यांनी सांगितले तर बॉम्बे इनव्हायरोन मेंटल ॲक्शन ग्रुपचे प्रकल्प अधिकारी अनिल पंडित व प्रकल्प अधिकारी मनाली राणे यांनी बोर्ली कोलमांडला येथील ग्रामस्थांनी आम कांदळवन सुरक्षा ॲप वर तक्रार केली,त्यानुसार आज रोजी त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता कांदळवन क्षेत्रात मोठया प्रमाणावर भराव टाकण्यात आला असून त्यात खूप मोठया प्रमाणात का़ंदळवनाची झाडे दबली गेली असून कांदळवणाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच आजूबाजूला निरीक्षण केले असता झाडें सुध्दा तोडण्यात आली असल्याचे दिसून आले. ह्यात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करावी.असे मत मांडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर