म्हसळ्यामध्ये शांती संमेलन व बंधुता मेळाव्यातून सामाजिक सलोख्याचा संदेश ! जे.एम.एम.एज्युकेशन सोसायटीचा उपक्र
कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)म्हसळा येथे जे.एम.एम.एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाझीम चोगले यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला शांती संमेलन व बंधुता मेळावा शांतता आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून देणारा ठरला !
यावेळी डी.वाय.एस.पी सविता गडगे, पोलीस निरीक्षक संदीप कहाले,हिंदू समाज तालुका अध्यक्ष समीर बनकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के, बौद्ध समाज अध्यक्ष करण गायकवाड, कोळी समाज अध्यक्ष अनिल बसवत, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर टेकले,कुंभार समाज अध्यक्ष सुरेश कुडेकर, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष नंदू शिर्के,पत्रकार महेश पवार, सुशील यादव,खारेगाव माजी सरपंच अनंत नाक्ती, किरण पालांडे,महेश घुले,सुधाकर येलवे,संदीप चाचले, हिंदू समाज अध्यक्ष नंदु गोविलकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेडगे मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजातील शांतता व एकता टिकवण्यासाठी असे कार्यक्रम अनिवार्य असून यातून लोकांमध्ये सामंजस्य व सकारात्मक दृष्टिकोन वाढतो.असे डी.वाय.एस.पी.सविता गडगे यांनी आपले विचार मांडताना सांगितले.यावेळी पोलिस निरीक्षक संदीप कहाले यांनी आपले विचार मांडले तर प्रमुख वक्ते जनाब कलीम मोहम्मदी (धार्मिक अभ्यासक), जनाब अब्दुल मुईद मदनी (धार्मिक स्कॉलर), आणि दिगंबर टेकले यांनी यावेळी शांततेचा संदेश देत सामाजिक सलोख्याचे महत्त्व स्पष्ट करून समाजातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक विचारांच्या देवाणघेवाणीवर भर दिला.या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या