Type Here to Get Search Results !

मुरुडच्या अंजुमन महाविद्यालयात रस्तेसुरक्षा जनजागृती

 मुरुडच्या अंजुमन महाविद्यालयात रस्तेसुरक्षा जनजागृती 

कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर)संपूर्ण देशात रस्ता सुरक्षा अभियान या महिनाभर राबविण्यात येत आहे याच अनुषंगाने अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रायगड जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा वाहतूक शाखा रायगड-अलिबाग व लायन्स क्लब श्रीबाग (अलिबाग), यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आज दि. ११ जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये माननीय पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर मुरुड पोलिस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखा रायगड चे पोलिस हवालदार प्रशांत म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांविषयी सविस्तर माहिती देऊन वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व विशद केले.

या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे चेअरमन जैनुद्दीन कादरी व प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  या कार्यक्रमाला , अल्ताफ मलिक, खजिनदार , महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य इम्रान मलिक, इस्माईल शेख व तौसिफ़ फत्ते, जिल्हा वाहतूक शाखा रायगड चे सहाय्यक फौजदार संतोष गायकवाड, सहाय्यक फौजदार महेंद्र खोत, पोलिस हवालदार किशोर पठारे आणि मंगेश कावजी उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निदा गोरमे यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरोज शेख, प्रा. अल्ताफ फकीर, प्रा. जावेद खान मणियार व विद्यार्थी प्रतिनिधी अरफा कलबस्कर,माज दाते, अय्यान पंगारकर,उसमा नखतारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर