विद्यार्थ्यांनी प्रयत्न व जिद्द ठेवली तर यश प्राप्त होते : शाहनवाज उकये
* मजगांव -ताम्हाणे माध्यमिक विद्यालयात विविध गुणदर्शन व बक्षीस वितरण समारंभ
कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी प्रयत्न व जिद्द ठेवली तर यश प्राप्त होते.असे प्रतिपादन तळा तालुक्यातील मजगांव -ताम्हाणे येथील बंदरकाठा माध्यमिक विद्यालयातील भारती विद्यापीठ संस्थेचे कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी म्हसळा विद्यार्थी अध्यक्ष शाहनवाज उकये यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.मुख्याध्यापक आर.वाय. देशमुख यांनी मान्यवर यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शाहनवाज उकये यांनी भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांची प्रतिमा शाळेला भेट दिली व मार्गदर्शन करताना इंजिनीरिंग अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रवास विद्यार्थ्यांनां प्रेरणा देण्यासाठी कथन केला.या वेळी इस्माईल वगनाग (मजगाव )रामचंद्र पाखर (अध्यक्ष ताम्हणे ),लक्ष्मी वतारी मॅडम (अध्यक्षा ताम्हणे )जाईलकर मॅडम (अध्यक्षा मजगाव ), माजी सरपंच जानूदादा पाखरे(मजगाव ),कुंभळे मुख्याध्यापक मोदजी भांजी,बाळू मगर (ताम्हाणे),
शेख सर (मुख्याध्यापक गणेशनगर ) विष्णू थेटे सर, श्री. देडे सर, विकास राठोड सर (वाशी हवेली ), अविनाश जाधव सर( कुडे ), कर्मचारी,शिक्षक वृंद,माया खालू (पालक प्रतिनिधी )परशुराम पाखड
विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.ए.बोबडे,नियोजन सौ.पी.व्ही. मेथा,एस.ए. वसावे, कु.द्वारका शीतकर यांनी केले. सूत्रसंचालन पी.वाय.लहारे तर कु.मिनाक्षी जैन यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या