जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे उसरोली फाटा येथे रक्तदान शिबीर संपन्न : तालुक्यासह आजुबाजूच्या परिसरातील शेकडो जणांनी केले रक्तदान
कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर) श्री जगद्गुरु नरेंद्र महाराज नाणीज धाम (दक्षिण रायगड जिल्हा) तर्फे मुरुड तालुक्यातील उसरोली फाटा येथे आगरी समाज हॉलमध्ये विहूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश दिवेकर यांच्या हस्ते उसरोली माजी सरपंच मनीष नांदगावकर, प्रमुख मान्यवरांचा उपस्थितित रक्तदान महायज्ञ शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन श्रीगणेश मुर्ती, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला व जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
श्री संप्रदाय तालुका अध्यक्ष अंकुश वाडकर, जिल्हा महिला अध्यक्षा अंजली जगताप, तालुका महिला अध्यक्षा प्राची पाटील, ब्लड कॅम्प पी.आर.ओ.संतोष चोरघे, सुधीर पुलेकर, अनंता भगत, किशोर भगत,तालुका सचिव जितेंद्र पाटील, सर्व संग्राम सैनिक यावेळी उपस्थित होते.
नरेंद्र महाराज नाणीज धाम दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर याही वर्षी - दिनांक ४ जानेवारी २०२५ ते दि. १९ जानेवारी २०२५ या कालावधीत रक्तदान - महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सिकलसेल, ॲनिमिया, हिमोफिलीया, थैलेसेमीआ, ब्लड कॅन्सर, किडनी फल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रूग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायामार्फत निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपला - बहुमोल वेळ काढून रक्तदान करून सामाजिक कार्यासाठी योगदान दयावे अशा प्रकारचे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.त्याचाच भाग दि.११/१/२०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस ॲड.महेश मोहिते, सहाय्यक नाणीज पीठ प्रमुख गणेश मोरे यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले.
या रक्तदान महायज्ञ शिबिरात सातारा येथील बालाजी ब्लड सेंटरच्या टेक्निकल स्टॉफने रक्त संकलन केले.याकामी युवा टिमने उत्तम सहकार्य केले.यावेळी तालुक्यातील व आजुबाजूच्या परिसरातील शेकडो जणांनी,सरकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या