कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार (डी.एल.एल.इ.) विभाग व मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उडाण महोत्सव-२०२५ डी.एल.एल.इ. विभागाचे संचालक प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला.
या महोत्सवामध्ये पथनाट्य, वक्तृत्व, पोवाडा, भित्तीपत्र व सर्जनशील लेखन याद्वारे सांस्कृतिक कलेतून समाजातील विविध पैलूवर जागरूकता निर्माण करण्याचे काम सहभागी विद्यार्थ्यांनी केले.
या महोत्सवानिमित्त डी.एल.एल.इ. विभागाचे प्रा. डॉ. कुणाल जाधव, प्रा. डॉ. सचिन राऊत, क्षेत्र समन्वयक डॉ. लियाकत परदेशी, डॉ. जे. आर. पांडे, डॉ. बामणे, डॉ. राठोड, डॉ. दत्ता कुंटेवाड, संस्थेचे अध्यक्ष अझीम खांजादा, महाविद्यालयाचे चेअरमन जैनुद्दीन कादरी, सदस्य इस्माईल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
अंजुमन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.उडाण महोत्सवातील विविध स्पर्धांची माहिती तसेच महाविद्यालयाबद्दल माहिती आपल्या प्रास्ताविकात देऊन सहभागी स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी महाविद्यालयाचे चेअरमन जैनुद्दीन कादरी यांनीही संस्थेबद्दल माहिती देऊन सहभागी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.डी.एल.एल.इ. विभागाचे संचालक प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना विद्यापीठाच्या उत्कृष्ट कामगिरीवर उजाळा टाकत विविध अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण करून विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विद्यापीठाचे नाव लौकिक करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी चुरशीने काम करून विद्यापीठामार्फत देण्यात येणारे पुरस्कार आपण प्राप्त करावेत व आपला सहभाग वाढवावा असे सूचित केले. या महोत्सवात रायगड दक्षिण विभागातून २४ महाविद्यालयातील जवळ जवळ ३०० स्पर्धक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निदा गोरमे यांनी केले. महाविद्यालयाचे विस्तार अधिकारी प्रा. रहीम बागवान, प्रा. जावेद खान तसेच सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्यासह विद्यार्थ्यांमध्ये जय खानविलकर, अमोघ मयेकर, सार्थक चोरघे, तमिम उलडे, अरफात लसने, उसामा नखतारे, माज दाते, अजय भाने, आयेशा फहीम, अशमाम किल्लेदार, निदा मुक्री, सहिमा मुकादम, सना चोगले आदीं.नी महोत्सव यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या