सुरई येथे स्वामीत्व योजनेंतर्गत सनद वाटप : ५४ सनदांचे करण्यात आले वाटप
कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील सुरई येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरपंच सपना जायपाटील मान्यवरांच्या हस्ते स्वामीत्व योजनेंतर्गत ५४ सनद वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रसाद माळी, भूमी अभिलेख विभागाचे भाल,ग्रामपंचायत सरपंच सपना जायपाटील,सदस्य वंदना भोईर,भारती बंदरी, ग्रामविकास अधिकारी मंगेश चांदोरकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद म्हात्रे,सदानंद पाटील, माजी सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या