साळावमध्ये क्षयरोग जनजागृती मोहीम
कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर)देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२५ ला भारत देशाला क्षयरोगापासून मुक्त करण्याचे ध्येय बाळगले असून ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दि.'७ डिसेंबर २०२४ ते दि.२४ मार्च २०२५' या कालावधीत १०० दिवशीय क्षयरोग मोहीम राबवण्यात येत आहे.
यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व लोकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन जाधव, मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉ पायल राठोड-क्षयरोग पथक ,प्रा. आ. केंद्र बोर्ली - मांडला, उपकेंद्र चेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप ग्रामपंचायत साळाव अंतर्गत सर्व गावांमध्ये घंडागाडीद्वारे क्षयरोगाची माहिती देण्यात येत असून ध्वनी प्रक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
त्यामुळे साळाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लोकांमध्ये क्षयरोगाची जनजागृती होऊन,क्षयरोग निर्मूलन होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत साळावचे सरपंच वैभव कांबळी, वरीष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक संकेत घरत, आरोग्य सहाय्यक अरुण माळी, परिक्षीत कोळी, आरोग्य सेवक गणेश जैतू, आरोग्य सेविका शिल्पा ठाकूर, गट प्रवर्तक रोशनी किल्लेकर, आशा सेविका कल्पना पाटील, माधुरी कांबळी घंटा गाडी द्वारे क्षयरोग जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या