उपविभागीय अधिकारी रमेश गोरे सेवानिवृत्त : मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निरोप समारंभ
कोर्लई,ता.16(राजीव नेवासेकर) मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय रमेश रंगनाथ गोरे हे आपली २७ वर्षे ७ महिने २५ दिवसाची सेवा उत्तम प्रकारे करुन दि.३१डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्यांचा सपत्नीक शाल श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
मनमिळावू प्रेमळ सर्वांना सोबत घेऊन काम करणारे रमेश गोरे हे दि.६ में १९९७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागात अहिल्या नगर - शेवगाव येथे कनिष्ठ अभियंता सेवेत रुजू झाले.सन.२०००मध्ये श्रीगोंदा,सन.२००३ते सन.२००६ अहिल्या नगर मार्ग प्रकल्प उपविभाग क्र.१ मध्ये नंतर सन.२००६ ते दि.४ में २०२२ पर्यंत अहिल्या नगर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक ४१ येथे शाखा अभियंता म्हणून उत्तम प्रकारे सेवा करुन दि.५ में २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी सेवेत उत्तम प्रकारे सेवा करुन सेवानिवृत्त झाले.
मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपकार्यकारी अभियंता विजय गांगुर्डे(अलिबाग),सहाय्यक अभियंता अजित सांगळे (मुरुड), उपअभियंता विनायक तेलंगे(अलिबाग), उपविभागीय अधिकारी संजय वायचळे(पाली),शाखा अभियंता उमाजी राठोड (मुरुड), दिलिप मदने(अलिबाग), विशाल देवकर (अलिबाग), नितीन राजपूरकर, समीर म्हात्रे,शुभम जाधव,विक्रम वडके मृणाल टोणपे, सय्यद आण्णा, रमेश गोरे यांचे आप्तेष्ट नातेवाईक, मुरुड कनिष्ठ अभियंता श्रद्धा बो-हाडे, दर्शन मिठाग्री, प्रफुल्ल घोलप, संदीप घुले, गणेश मार्कंड, रोशन पाटील व कर्मचारी वृंद उपस्थितांनी रमेश गोरे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन, सन्मान करण्यात येऊन पुढिल भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या