शालेय तांग सू डो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी !
कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर) क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आयोजित मुंबई विभागीय शालेय तांग सू डो स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार लढत देत १ सुवर्ण, ५ रजत व २ कांस्यपदके पटकावले.
कांदिवली येथील प्रकाश काॅलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स मध्ये तांग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर जिल्हा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आज दिनांक २१ डिसेंबर रोजी मुंबई विभागीय शालेय तांग सू डो स्पोर्ट्स क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात मुंबई विभागात समाविष्ट असलेल्या रायगड, ठाणे, मुंबई उपनगर व शहर आदी जिल्ह्यांतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंचा समावेश होतो.
रायगडमधील जिल्ह्यास्तरीय तांग सू डो क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत देखील दमदार लढत दिली. त्यात तळा येथील श्री.गो.म. वेदक विद्यामंदिर व ज्यू. कॉलेजचा खेळाडू शिव देवजी हिलम याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मजगांव येथील रा.जि.प.मराठी शाळा आणि नज अकादमी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची श्रेया जयेंद्र काबुकर, छत्रपती शिवाजी नुतन विद्यालयाच्या ध्रुव शिल्पा कळके, अमोघ समित दळवी, रेश्मा मंगेश भोईर यांनी व्दितीय क्रमांक मिळविला तर काव्या केतन नाक्ती व अनिह भालचंद्र जोशी हे कांस्यपदकाचे मानकरी ठरले !
सर्व खेळाडूंना तांग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ रायगड चे अध्यक्ष मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी व चाहात्यांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या