कोर्लई,ता.२३(राजीव नेवासेकर)महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था, कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल विद्या संकुलात शुक्रवार दि.२० डिसेंबर व शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४ या दोन दिवसीय वाक् स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श संस्था' पुरस्कार प्राप्त कोकण एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्था गेल्या १०७ वर्षांपासून ग्रामीण , दुर्गम भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून
लोकनेते ॲड. दत्ता पाटील (दादा) यांच्या कर्तृत्वामुळे खेड्यापाड्यात प्राथमिक शाळांपासून, वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे ठाणे, रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा कोकण किनारपट्टीत उभारून दादांनी शिक्षणापासून वंचित गोरगरिबांच्या दाराशी ज्ञानगंगा आणून पोहोचवली.
" वक्तृत्व" हा दादांच्या जिव्हाळ्याचा विषय होता ,संस्थेमध्ये दादांनी सुरू केलेली वाक् स्पर्धेची परंपरा आजही कायम सुरू ठेवण्याचे काम संस्थेचे ज्येष्ठ संचालक संजय दत्ता पाटील यांनी सांभाळली व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यमान अध्यक्ष ॲड.सिद्धार्थ संजय पाटील समर्थ पणे सांभाळीत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे कोकण एज्युकेशन सोसायटीचे ध्येय असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रमांची कास धरून ज्ञानग्रहणा बरोबरच वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,टाचन वही स्पर्धा व चित्रकला स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांमधून व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी कोकण एज्युकेशन सोसायटी सातत्याने प्रयत्नशील असते. या वर्षा पासून नृत्य स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या असून संस्थेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या विकास अंकाच्या "मुखपृष्ठ सजावट" स्पर्धा घेण्यात आली.
संस्थेच्या सर्व शाखांमधील गुणवंत व प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता पनवेलमध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्या संकुलात संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.सिद्धार्थ संजय पाटील, संस्थेच्या कार्यवाह ॲड.पल्लवी पाटील ,ज्येष्ठ संचालक संजय पाटील, ,संस्थेचे संचालक मंडळ , संचालक मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
शाळा समितीचे चेअरमन मा.आमदार बाळाराम पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली गावित, संकुलातील सर्व मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथांग परिश्रमातून कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडल्या बद्दल भरभरून कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले.त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला संकुलातील सर्व सभापती, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व संकुलातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड .सिद्धार्थ संजय पाटील यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
सर्व प्रथम विकास अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ संचालक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.त्या नंतर वकृत्व स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते गीत गायन स्पर्धेतील चारही गटातील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.तसेच बुद्धीबळ स्पर्धा , संस्थेतून दहावी आणि बारावी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,गीत गायन स्पर्धा, टाचन वही स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा विजेते सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.वकृत्व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट समजली जाणारी "शेतकरी करंडक ट्रॉफी" ही व्ही .के . हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पनवेल यांना विजेता म्हणून देण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पनवेल विद्या संकुलातील सर्व शाळांचे चेरमन , शाळा समिती सदस्य ,सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन किर्तिदा शेळके यांनी तर मुख्याध्यापिका वैशाली गावित यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या