मुरुडच्या अंजुमन महाविद्यालयात तीन दिवशीय वनस्पती उत्पत्ती संवर्धन प्रात्यक्षिके व प्रशिक्षण कार्यशाळा
कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ.साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती शास्त्र व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय वनस्पती उत्पत्ती संवर्धन प्रात्यक्षिके व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दि. २० ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साजिद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उदघाटन संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी आपल्या भाषणातून सहभागी प्रशिक्षणार्थीना उती संवर्धनाचे फायदे नमूद करून त्यामध्ये संशोधन करण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून डॉ. दक्षयिनी सहाय्यक प्राध्यापक अलॉयसिस (डीम टू बी युनिव्हर्सिटी), कर्नाटक यांची लक्षणीय उपस्थिती आहे. सहभागी विद्यार्थ्यांना तीन दिवसामध्ये वनस्पती उत्पत्ती संवर्धन प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेत ४० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. सादर प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रहीम बागवान आणि प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. जावेद मनियार हे काम पाहत असून यासाठी सहभागी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या