Type Here to Get Search Results !

तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेत नांदगाव मराठी शाळा प्रथम !SCHOOL

तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेत नांदगाव मराठी शाळा प्रथम !

कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर) रायगड जिल्हा परिषदेतर्फे मुरुड तालुक्यातील वळके येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या नाट्य स्पर्धेत नांदगाव मधील प्राथमिकSCHOOL क्रमांक -३ च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे !

रायगड जिल्हा परिषदेतर्फे व्यक्तिमत्व विकास स्पर्धा 2024  या अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा वळके येथे तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 10 डिसेंबर 2024 रोजी पार पडल्या.

    यामध्ये पथनाट्य स्पर्धेत नांदगाव मराठी शाळा क्रमांक-३ मधील विद्यार्थ्यांनी छोट्या गटात  खरच स्त्री सुरक्षित आहे का ? " या पथनाट्यास प्रथम क्रमांक मिळविला.विद्यार्थ्यांच्या यशात शाळेचे मुख्याध्यापक जयवंत देडगे व उपशिक्षिका पूजा तोताडे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर