Type Here to Get Search Results !

NARENDR MAHARAJ मजगांव- उसरोली मध्ये नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे माधुकरी अभियान

    NARENDR MAHARAJ मजगांव- उसरोली मध्ये नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे माधुकरी अभियान




कोर्लई, ता.१३(राजीव नेवासेकर)जगदगुरु श्रीस्वामी नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे मुरुड तालुक्यातील मजगांव, आदाड,उसरोली व वालवटी येथे आज पासून माधुकरी अभियान राबविण्यात येत आहे.

    या अभियानांतर्गत १० सेवा केंद्रांमध्ये ५० गावात माधुकरी अभियान आज पासून राबविण्यात येत असून ५ टन तांदूळ जमा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.या माधुकरी अभियानातून जमा झालेल्या धान्यातून नाणीज येथील संस्थानात गोरगरीबांना तसेच भक्त गणांना दररोज महाप्रसाद दिला जातो.ज्या ज्या भाविकांनी या अभियानास प्रतिसाद देऊन सहकार्याचा हात पुढे केला, त्या भाविकांचे श्री नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

    कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी संतसंगातील दहा सेवा केंद्रांतील अध्यक्ष, महिला अध्यक्ष व भक्त गणांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे.

          श्री संप्रदायाचे मुरुड तालुका अध्यक्ष अंकुश वाडकर,सचिव जितेंद्र पाटील, कमांडर, जिल्हा महिला अध्यक्षा अंजली जगताप, तालुका महिला अध्यक्षा प्राची पाटील,महेश मोठेबुवा, संतोष चोरघे, सुधीर पुळेकर, भजनी बुवा मधुकर कुद्रुसे, अनंता भगत यांसह भक्तगण व महिला वर्ग मोठ्या संख्येने आजच्या अभियात सहभागी झाला होता.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर