यशवंत नगर पंचक्रोशी येथे नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड आणि पनवेलच्या आर झुनझुनवाला शंकरा नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने 12 डिसेंबर 2024 रोजी अंजुमन हायस्कूल परिसर यशवंत नगर पंचक्रोशी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात शंकरा रुग्णालयातील डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांनी डोळ्यांच्या दोषाने त्रस्त असलेल्या लोकांची तपासणी केली. या शिबिराचा मुरुड परिसरातील सुमारे 200 लोकांनी लाभ घेतला. या शिबिरात २५ जणांना मोतीबिंदू आढळून आले असून त्यांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. यावेळी सुमारे 50 जणांनी स्वस्त दरात चष्म्यांचा लाभ घेतला.
महाविद्यालयाचे अध्यक्ष जैनुद्दीन कादिरी व प्रभारी प्राचार्य डॉ.साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.फिरोज शेख व प्रा. निदा गोरामे यांनी स्वयंसेवकांसह शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या