Type Here to Get Search Results !

नांदगावात रानगव्याचा शिरकाव :एका ग्रामस्थावर केला हल्ला Rangava

नांदगावात रानगव्याचा शिरकाव :एका ग्रामस्थावर केला हल्ला 

कोर्लई,ता.२१ (राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील नांदगाव मध्ये रानगव्याचा शिरकाव झाला. गावामध्ये एका ग्रामस्थावर हल्ला करून हा पसार झाला. यामध्ये हा ग्रामस्थ किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

        रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अभयारण्य म्हणजेच मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य आहे. या अभयारण्यात काही वर्षापूर्वी रानवे सोडले होते आता या रानगव्यांची संख्या वाढत असल्याने. त्यांचा तालुक्यामध्ये संचार सुद्धा वाढला आहे. फणसाड अभयारण्य नांदगाव लागुन असल्याने हे रानगवे गावात शिरले होते. 

        मुरुड तालुक्यातील नांदगावच्या समुद्र किनारी पहाटे ग्रामस्थांना गव्याचे दर्शन झाले. सदर गवा हा गावालगतच्या फणसाड अभयारण्यातून आला असून शुक्रवारी सकाळी तो नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील खालचा मोहल्ला परिसरातील गौतम दाबणे यांच्या नारळ सुपारी बागेतून रस्त्यावर आला. दरम्यान एका व्यक्तीला त्याने टक्कर मारुन तो नांदगाव समुद्रकिनारी पळून गेला. त्यानंतर त्याने समुद्र किनाऱ्यासह नजिकच्या बागांतून हुंदडत परत फणसाड अभयारण्याकडे कूच केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान नांदगाव ग्रामपंचायतीचे सदस्य जितेंद्र दिवेकर यांनी सदर गव्याची माहिती मुरुडच्या वनखात्याला दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर