शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण जीवनशैली हाताळण्याची संधी : तुकाराम पाटील
* वाणदे येथे मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या सातदिवशीय शिबिराचा शुभारंभ
कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)शहरी भागात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन अनुभवता यावे म्हणून शिबिर घेणे आवश्यक असून अशा शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जीवनशैली कशी असते ते हाताळण्याची नामी संधी मिळत असते.असे भावपूर्ण विचार खार आंबोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील यांनी मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित सात दिवशीय विशेष श्रम संस्कार निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मांडले.
येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागातर्फे वाणदे येथे दि.18 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सात दिवसीय शिबीर घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत सरपंच गुलाब वाघमारे, सदस्य अमोल पाटील, सुप्रिया भोपी,तुकाराम पाटील,महाविद्यालय विकास समितीचे सुभाष महाडिक, सदस्या वासंती उमरोटकर मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
खारआंबोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन तुकाराम पाटील, वसंतराव नाईक महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या वासंती उमरोटकर, सुभाष महाडिक, प्र.प्राचार्य डॉ. जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर यांनी शिबिराच्या आयोजना बाबत मार्गदर्शन केले.
आम्हाला खूप दिवसांनंतर शिबीर घ्यायची संधी मिळाली असून तुम्हाला शिबिराच्या कालावधीत कोणतीच अडचण येऊ देणार नाही,सर्वतोपरी सहकार्य करु. अशी ग्वाही तुकाराम पाटील यांनी दिली.यावेळी वासंती उमरोटकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना बाबतचा आपला अनुभव सांगून सविस्तर मार्गदर्शन केले तर सुभाष महाडिक यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या