शालेय सहलींनी बहरले मुरुडचे पर्यटन ! पहाटेच्यावेळी समुद्रकिनारी विद्यार्थीची मांदियाळी
कोर्लई,ता.२१ (राजीव नेवासेकर)जगप्रसिद्ध मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून मुरुडमध्ये शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या सहली दाखल होऊ लागल्या आहेत. संध्याकाळी रात्री उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहली या पहाटेच्या वेळी मुरुडच्या समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने मनमुराद आनंद लुटताना दिसत असून सहलींनी पर्यटन बहरले आहे.
दिवाळीची सुट्टी पडल्यानंतर या शाळेय विद्यार्थ्यांच्या सहलींना सुरुवात होते. मुरुड जंजिरा किल्ला आज जगभर पर्यटकांचे आकर्षण झालेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातून शालेय, महाविद्यालयाच्या सहली मुरुडमध्ये दाखल होत आहेत. पुणे, नाशिक, संभाजीनगर, जळगाव, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे सह राज्यातील सर्व जिल्ह्यातून सहली दाखल होत आहेत. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरील राज्यातील सुद्धा सहली जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत आहे. कर्नाटका राज्यातून आलेले विद्यार्थी यांच्याही अनेक बसेस पहावयास मिळाल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या