Type Here to Get Search Results !

काशिद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिंदे गटाचे सुमित कासार यांची बिनविरोध निवड Kashid

 काशिद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिंदे गटाचे सुमित कासार यांची बिनविरोध निवड 

कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर )मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सभेत शिंदे गटाचे सुमित रमेश कासार यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

      काशिद ग्रामपंचायती मध्ये समीक्षा मितेश दिवेकर यांचा कालावधी पूर्ण झाल्याने,स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानेे उपसरपंचपद रिक्त झाले  होते.ग्रामपंचायतीची सभा यांच्या सरपंच तथा अध्यासी अधिकारी 

संतोष राणे यांच्या अध्यक्षतेखाली.दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजता घेण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सुशांत ठाकूर यांनी सचीव म्हणून काम पाहिले. यावेळी उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडीत सुमित रमेश कासार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सुमित रमेश कासार यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

       ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राणे, मावळत्या उपसरपंच समीक्षा दिवेकर,सदस्य अमित नाईक, मनीषा मोरे, मोनिका महाडिक, विशाल खेडेकर, सुविधा दिवेकर, दिपेश काते, दिया कासार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे,सुनील दिवेकर,अमित खेडेकर, विलास दिवेकर, दिनेश दिवेकर, विलास सारंगे, विलास दिवेकर,नरेश मरावडे, नंदकुमार काते,निलेश दिवेकर, मितेश दिवेकर, रोहन खेडेकर, संदीप कासार, ग्रामपंचायत अधिकारी सुशांत ठाकूर, कर्मचारी, डाटा ऑपरेटर यांसह ग्रामस्थ व उपस्थित महिलांनी सुमित कासार यांच्या निवडीचे अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुमेच्छा दिल्या .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर