Type Here to Get Search Results !

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन free

 जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

रायगड,(जिमाका)दि.24:  जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता दि. 26 डिसेंबर, दि.27 डिसेंबर आणि दि.28 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सकाळी 09.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्वानी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे.

     या  शिबिरामध्ये  मेडिसीन विभाग-उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तपासणी व उपचार, हृदयरोग-गरजेनुसार 2D  ECHO, X -ray, USG, ECG (stemi), डोळ्यांची तपासणी-डोळ्यांचे आजार व मोतिबिंदू चेकअप, मोफत चष्मे वाटप,  स्त्रीरोग तपासणी-महिलांचे आजार, स्तन कर्करोग व गर्भाक्षयमुख कर्करोग तपासणी, नाक,कान, घसा तपासणी-ENT तपासणी व शस्त्रक्रिया, गरजेनुसार एन्डोस्कोपीद्वारे कानाची श्रवण वाटप, ऑर्थोपेडिक-चेकअप, एक्स-रे, फिजिओथेरपि सुविधा, दंत विभाग- मुख आरोग्य तपासणी, दातांचे आजार, कवळी बसवणे, सर्जरी-हर्निया, हायड्रोसिल तपासणी व शस्त्रक्रिया, मानसिक-मानसिक आजार तपासणी, उपचार व तपासणी, आयुष-पंचकर्म, आयुर्वेद उपचार, समुपदेशन, आभाकार्ड-मोफत आभाकार्ड काढून दिले जाईल तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जातील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर