मुरुड तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत : ग्रामपंचायत, नगरपरिषद प्रशासन दखल घेणार काय ? नागरिकांचा सवाल
कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर)गेल्या अनेक महिन्यांपासून मुरुडसह तालुक्यातील विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांची दहशत असून अनेकांना आतापर्यंत श्वानदंशाला सामोरे जावे लागले असून नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत व नगरपरिषद प्रशासन दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करणार काय ? असा सवाल जनमानसातून विचारला जात आहे.
मुरुड तालुक्यात अनेक ठिकाणी तसेच समुद्र किना-यावर गेल्या अनेक दिवसांपासून विशेष करून सकाळच्या वेळेत भटक्या कुत्र्यांची दहशत असून पर्यटक व नागरिकांची डोकेदुखी ठरत असून याकडे शासनाच्या संबंधित तसेच नगरपरिषदेच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत असून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुरुड तालुका तसेच समुद्र किनारी सकाळच्या वेळेत भटके कुत्रे टोळक्याने फिरताना दिसतात.त्यामुळे सकाळच्या वेळेत समुद्र किनारी फिरायला (माॅर्निंग वाॅकला)जाणा-या नागरिकांची व पर्यटकांची डोकेदुखी ठरत आहे. मुरुड मध्ये देखील श्वानदंश झाल्याच्या घटना ताज्या असून कोळीवाडा परिसरात रोजच एकतरी श्वान दंश झाल्याच्या घटना घडत आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.यासाठी संबंधित नगरपरिषद प्रशासनाकडून पाहाणी करण्यात येऊन शहानिशा करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.
(फोटो घेणे)
________________________________________
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या