Type Here to Get Search Results !

वावडुंगी-शिघ्रे येथे विशेष श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा


 वावडुंगी-शिघ्रे येथे विशेष श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा 

कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर) कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालय वाणदे येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिरामध्ये वावडुंगी-शिघ्रे येथे विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा बांधल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

     मुरुड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ, कृषी सहायक एम.जी.कदम,ए.जी.उपाध्ये, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, शेतकरी प्रमोद मसाल, महाविद्यालय विकास समिती, प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे,प्रा. डॉ. एस. एस. बहिरगुंडे, प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली

 यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वावडुंगी-शिघ्रे येथे विद्यार्थ्यांनी बांधण्यात आलेल्या वनराई बंधा-यामुळे पशु-पक्षी व गुरेढोरे तसेच नदीकाठच्या रब्बी हंगामातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना,ग्रामस्थांना पाणी साठा उपलब्ध झाल्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर