कोर्लई,ता.11(राजीव नेवासेकर) पंचकुला-हरियाणा येथे संपन्न झालेल्या २५ व्या नॅशनल सिकई स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेता चषक पटकावला तर रायगड जिल्ह्यातील ध्रुव शिल्पा कळके व शिव देवजी हिलम यांनी सुवर्णपदक आणि रेश्मा मंगेश भोईर हे रजत पदकाचे मानकरी ठरले असून सांघिक प्रकारात उत्तम लढत देत काव्या केतन नाक्ती, रुग्वेद विकास नाईक, यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला.
ताऊ देवी लाल स्टेडियम, पंचकुला, हरियाणा येथे दिनांक ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ दरम्यान स्पर्धा संपन्न झाल्या.
यात रायगड जिल्ह्यातील आठ खेळाडूंची महाराष्ट्रातील संघात निवड झाली होती. महाराष्ट्रातील खेळाडूंनी जबरदस्त लढत देत प्रथम उपविजेता चषक पटकावला. रायगड मधील मजगावच्या ध्रुव शिल्पा कळके याने के-२ या कलात्मक क्रीडा प्रकारात व अलिबाग च्या शिव देवजी हिलमने लोबा फाईट प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला असून सांघिक प्रकारात काव्या केतन नाक्ती व रुग्वेद विकास नाईक यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या