मुरुड-केळघर-रोहा रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट ? साईडपट्ट्याही धोकादायक
कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर)मुरुड व रोहा दोन तालुक्यांना जोडणारा केळघर मार्गे रस्ता सर्वात नजीकचा रस्ता आहे. हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत होता. वेळ उशिराने संबंधित बांधकाम खात्याने या रस्त्याचे डांबरीकरण केले तेही अर्धवटच आणि या ठिकाणी असलेल्या साईड पट्ट्या न दोन दोन फूट न भरल्यामुळे दुचाकी स्वारांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
मुरुड-गारंबी-केळघर मार्गे रोहा हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत होता. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अखेर संबंधित बांधकाम खात्याला मुहूर्त सापडला. पण रस्ता करीत असताना धनगरवाडी पासुन ते केळघर पर्यंत बनविण्यास सुरुवात केली. या मार्गावर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जुना रस्ता अंदाजे दोनशे मीटर पर्यंत बनविलेच नाही. असे सुमारे तीन ते चार ठिकाणी रस्त्यावर डांबरीकरण अर्धवट सोडून ठेवले आहे.
तरी हे अर्धवट सोडलेले रस्ते पुर्ण डांबरीकरण करण्यात यावे व खोल असलेल्या साईड पट्ट्या लवकरात लवकर भरण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने समाज सेवक गोविंद हिरवे यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या