मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात Legal Guidance
कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स तालुका विधी सेवा समिती व दिवाणी न्यायालय यांच्या सयुंक्त विद्यमाने नागरिकांसाठी कायदेविषयी जागरूकता उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्यांची माहिती करून देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन जिल्हा विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश घनःश्याम तिवारी (क. स्तर) मुरुड -जंजिरा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. Legal Guidance
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा विविध कायद्यांची तोंडओळख करून सोबतच शिक्षणाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्याने कोणत्याही संस्थेतून शिक्षण घेऊन उच्चपदावर पोहचण्याचे ध्येय व चिकाटी स्वतःच्या मनात ठेवून नावलौकिक करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे.असे आवाहन जिल्हा विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश घनःश्याम तिवारी यांनी केले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद फ.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वकील बार मुरुड चे सचिव ॲड.डी.एन.पाटील तर सदस्य ॲड. इकरा शेखाणी व ॲड. एम.एम.सतविडकर यांच्या सह मुरुड न्यायालयातील लिपिक मतीन अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यशाळेत ॲड.डी.एन.पाटील यांनी हुंडाबंदी कायदा,ॲड.इकरा शेखाणी यांनी परिवार व त्याचे संगोपन कायदा तसेच ॲड.एम.एम.सतविडकर यांनी बालकांचे लैगिंक शोषण रोखण्याविषयी कायदा याची अत्यंत सोप्या भाषेत विविध कलमांची माहिती उपस्थित सर्वाना करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. शोएब खान यांनी केले.सूत्रसंचलन डॉ.स्वाती खराडे तर प्राचार्य डॉ.साजिद शेख यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या