कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर)पंचकुला , हरियाणा येथे होणाऱ्या २५ व्या नॅशनल सिकई चॅम्पियनशीप करीता महाराष्ट्र संघात रायगड जिल्ह्यातील आठ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात मुरुड तालुक्यातील ५ व अलिबाग तालुक्यातील ३ खेळाडूंचा समावेश आहे.
ताऊ देवी लाल स्टेडियम, पंचकुला, हरियाणा येथे दिनांक ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील राज्यपातळीवर प्रथम क्रमांक पटकावणारे उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली जाते. नुकतेच वर्धा येथील राज्यस्तरीय सिकई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या रायगड जिल्ह्यातील आठ खेळाडूंची महाराष्ट्रातील संघात निवड झाली आहे. यात मुरुड तालुक्यातील मजगावचे ध्रुव शिल्पा कळके, काव्या केतन नाक्ती, रेश्मा मंगेश भोईर, व नांदगावचे अमोघ समित दळवी, आर्यन स्वप्निल गद्रे यांचा तसेच अलिबाग तालुक्यातील रूग्वेद विकास नाईक , देवदत्त मनिष पडवळ आणि शिव देवजी हिलम यांचा समावेश आहे.
दि. रायगड डिस्ट्रिक्ट सिकई मार्शल आर्ट असोसिएशन चे अध्यक्ष विजय चंद्रकांत तांबडकर यांचे नेतृत्वात महिला संघ व्यवस्थापक श्रध्दा श्रीकांत गद्रे व पुरुष संघ व्यवस्थापक केतन विष्णू नाक्ती यांच्या बरोबर आज संघ हरियाणा करीता रवाना झाला असून जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या