Type Here to Get Search Results !

मुरुड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश सदरे यांचे निधन



मुरुड जंजिरा ता.५ ( संजय करडे )मुरुड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सदरे यांचे राहत्या घरी हृदय  विकाराच्या तीव्र झ्टक्याने निधन झाले आहे.वयाच्या ६४  व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक सागर वर्तमान पत्रातून सुरू केली.त्यानंतर त्यांनी अनेक वर्तमान पत्रातून अभ्यासपूर्ण लेख तसेच विविध समस्या पर बातम्या प्रसिद्ध करून सर्वसामान्य नागरिकांचे ते विशेष चाहते झाले होते.

  गेली 30 वर्ष ते पत्रकार म्हणून सजग भूमिका बजावत होते. पत्रकार म्हणून त्यांनी मुरुड तालुक्याच्या अनेक समस्या मांडल्या त्यामध्ये विशेष म्हणजे रोहा येथून केळघर मार्गे मुरुड हा रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेत अनेक वेळा वर्तमान पत्रातून समस्या मांडून हा रस्ता तयार करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

मच्छिमारीच्या समस्या सातत्यपूर्ण  मांडून अनेकवेळा बातम्यतून वाचा फोडली ,३० वर्षाच्या कारकिर्दीत सतत काम कारणारा पत्रकार गमावल्याचे दुःख कोकणातील असंख्य पत्रकार व्यक्त करीत आहेत.शांत स्वभाव व समाजातील सर्व घटकांशी त्यांचे आपुलकीचे नाते होते.गेली अनेक वर्ष त्यांनी बँक ऑफ इंडिया मध्ये सेवा बजावून कॅशियेर पदावरून सेवा निवृत्त झाले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली ,नातवंडे व १ भाऊ  असा परिवार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर