Type Here to Get Search Results !

समाजसेवा शिबिरातून केली शालेय विद्यार्थ्यांनी बंधाऱ्याची निर्मिती

 समाजसेवा शिबिरातून केली शालेय विद्यार्थ्यांनी बंधाऱ्याची निर्मिती




मुरुड जंजिरा
( संजय करडे )  पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून शालेय विद्यार्थी एकत्र येत नदीचे पाणी आडवण्यासाठी भला मोठा दगडी बंधारा बांधून सामाजिक बांधिलकी जपली आहे.पीटसई येथील पीटसई विभाग ज्ञान  प्रसारक मंडळ संचलित अशोक लोखंडे विद्यामंदिर येथील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शाळेच्या शिक्षक वृंद यांच्या सोबतीने शेनाटे येथील आदिवासी वाडी येथे जाण्याच्या मार्गावर नदी वाहत असते या नदीवर संपूर्ण दगडी बंधारा बांधून पाणी अडवण्याचे बहुमूल्य कार्य केले त्याच प्रमाणे येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा बनवला त्यामुळे या भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना एक चांगला रस्ता सुद्धा बनला आहे.

   आज या शाळेने समाज सेवा शिबीर राबवत असंख्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे.दगडी बंधारा बांधण्या बरोबरच शाळेचे मैदानावर मातीचा भराव टाकणे,शाळेच्या परिसरात पावसामुळे वाढलेली झाडी झुडपे नष्ठ करणे,शाळेचे क्रीडांगण साफ करणे,नदीची स्वछता करणे,शाळेचा आजूबाजूचा परिसर स्वछ करणे,आदी स्वरूपाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.यासाठी येथील शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरातील फावडे,कोयती,पिकाव,पारय आदी वस्तू घरून आणून हा सामाजिक उपक्रम राबवला.

यावेळी या शाळेचे चेरमन खेळू वाजे हे स्वतः उपस्थित राहून शालेय मुलांना प्रोहत्साहंन दिले.चेरमन खेळू वाजे यांनी सांगितले कि, शालेय विद्यार्थ्यांना समाज सेवा शिबिराचे महत्व कळावे व समाजाशी आपली काही बांधिलकी आहे याचे ज्ञान त्यांना व्हावे यासाठी हा विशेष उपक्रम राबवला आहे.या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी शासनाच्या ध्येय धोरण प्रमाणे पाणी अडवल्याने पाण्याची पातळी वाढणार आहे यासाठी शेनाटे येथील आदिवासी वाडी येथे दगडी बंधारा बांधण्यात आला आहे.तसेच इतर सामाजिक काम सुद्धा विद्यार्थ्यांनी केली आहेत..

यावेळी मुख्याध्यापक संतोष रेडीज,अरुण खुळपे,अकील मुलानी,संजय ठमके,भागीनाथ बांगर ,संदीप इंगवले,सुनील तेलंगे,एकनाथ कोळी,सुप्रिया रेडीज,नीलम गोळे,रेखा रेडीज आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी  या समाज सेवा शिबिरास मोठी मदत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर