Type Here to Get Search Results !

ध्वज दिनी निधी संकलन हे मोठे देशकार्य -- निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के

ध्वज दिनी निधी संकलन हे मोठे देशकार्य -- निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के


जिमाका(रायगड)दि. ९ :- देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून सैनिकांसाठी भरघोस निधी जमा करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालययातील नियोजन भवन येथे आज यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ २०२४  करण्यात आले.

यावेळी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रविकिरण कोले,जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, जिल्हा उद्योग केंद्र,महाव्यवस्थापक जी एस हरळय्या,शिक्षणाधिकारी (प्रा) श्रीमती पुनिता गुरव,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कर्नल राहुल माने (निवृत),  ऍडमिरल रामदास  (लक्ष्मी नारायण परम  विशीष्ट सेवा मेडल) पत्नी श्रीमती ललिता रामदास आदी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील युद्ध विधवा, वीर माता / वीर पिता, वीर पत्नी व सेना मेडल धारकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

ध्वज निधीसाठी सढळ हाताने निधी देणारांचा सत्कार तसेच माजी सैनिकांच्या पाल्याना शैक्षणिक शिष्यवृत्ती आर्थिक मदत आणि सन २०२३-२४ ध्वजदिन  निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध कार्यालयांना विशेष गौरवचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

भारतमातेच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहूती देऊन सर्वोच्च बलिदान दिले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला. यावेळी शासकीय कर्मचारी निवृत्त जवान  उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर