परिवहन विभागात ऑनलाईन फेसलेस पद्धत कार्यान्वित
रायगड जिमाका दि.०९: परिवहन विभागाद्वारे ऑनलाईन फेसलेस पद्धतीने शुल्क भरणा करून आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
सदर सेवा पूर्णपणे फेसलेस स्वरूपाची असून अर्जदारास त्यासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांकाचा वापर करून किंवा मोबाईलद्वारे O.T.P. घेऊन https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करून नोंदणी क्रमांक आरक्षित करता येऊ शकेल तसेच सद्य:स्थितीत नवीन मालिका सुरू झाल्यानंतर होणारी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन राहील.
तसेच कार्यालयातील लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित नोंदणी क्रमांक ऑनलाईन फेसलेस पद्धतीने शुल्क भरून आरक्षित करता येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
तरी, जास्तीत जास्त नागरिकांनी परिवहन विभागाच्या सदर फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांचेकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या