* मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात बॅ.ए.आर.अंतुले यांचा स्मृतिदिन साजरा
![]() |
Rigad maza news |
कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर) माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबविलेल्या अनेकविध योजना, सत्तेत राहून व नंतरच्या काळात केलेले समाजोपयोगी कार्य चिरंतन स्मरणात राहील.असे प्रतिपादन मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात बॅ.ए.आर.अंतुले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालय विकास समिती सदस्य ॲड.इस्साईल घोले यांनी केले.
महाविद्यालय विकास समिती सदस्य ॲड.इस्माईल घोले, रियाज ढाकम, उद्धव मुंबईकर, नाना गुरव,नयन कर्णिक, विजय सुर्वे, ॲड.कुणाल जैन,किसन बळी, तुळशीदास चोगले, प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.मुरलीधर गायकवाड, प्रा.डॉ.सिमा नाहिद, प्रा.डॉ.एन.एन.बागूल,प्रा .एस.एल.म्हात्रे व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी बॅ.ए.आर.यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी स्व.बॅ.ए.आर.अंतुले व बारशीव येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा शासकीय ठेकेदार मनोहरशेठ महाडिक यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.यावेळी प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे,प्रा.सुभाष म्हात्रे यांनी आपले विचार मांडले.
यावेळी बॅ.अंतुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य.डॉ.जे.के.कांबळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.मुरलीधर गायकवाड यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या