कोर्लई ता. ३(
राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव भवानी पाखाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक २च्या भव्य क्रीडांगणावर नांदगाव केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तीमत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन नांदगाव शाळा क्रमांक २चे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश नागांवकर, उपाध्यक्षा रिया चोरघे मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी केंद्रप्रमुख दिनेश म्हात्रे, मुख्याध्यापक प्रकाश नांदगावकर(काशिद), हेमकांत गोयजी(मजगांव), श्रद्धा म्हात्रे (व्हावे),संगीता खानावकर(नांदगाव -१) व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यास्पर्धेत दोरी उडी स्पर्धेत इ.१ते ४ गटात स्वरा गुंड (चिकणी), इ.५ ते ७ गटात कस्तुरी दिवेकर (काशिद) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.बेचकीने नेम धरणे या स्पर्धेत १ ते ४च्या गटात आयुष जाधव (शाळा-वाळवटी) प्रथम क्रमांक व इ.५ ते इ.७ च्या गटात किशोर वाघमारे (शाळा मजगाव मराठी )प्रथम क्रमांक तसेच मातीकाम या स्पर्धेत इ.१ ते इ४ च्या गटामध्ये कु. गार्गी जितेश मेंगाळ (शाळा बेलीवाडी) प्रथम क्रमांक व इ.५ ते इ.७ च्या गटात कु. हार्दिक सिताराम पतेने (शाळा वावे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
लगोरी स्पर्धेत इ.१ली ते ४ थी गटात उसरोली शाळेने प्रथम क्रमांक तर इ.५वी ते इ.७वी. गटात वावे शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला तर लंगडी स्पर्धेत इ.१ ते ४ च्या गटान नांदगांव नं. १ शाळा प्रथम क्रमांक व इ.५वी ते ७वी च्या गटात शाळा काशिद यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.सर्व विजेत्या संघास व शैक्षणिक स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकास बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच केंद्रप्रमुख दिनेश म्हात्रे, यांनी उत्तम आयोजन केले, मुख्याध्यापक संगीता खानावकर, श्रद्धा म्हात्रे,हेमकांत गोयजी, प्रकाश नांदगावकर, प्रमोद म्हात्रे ,मंगेश गोयजी राजेंद्र साळावकर ,बाळासाहेब फुंदे, आकाश मंडले, सागर बागडे, रविंद्र राठोड, अनंता थळे, राजेंद्र बुल्लू, मन्मथ मठपती, गौरव पाखरे, ओमकार भोई,संदीप भगत, पल्लवी भोईर व शिक्षकांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन हेमंत नांदगावकर यांनी केले.
________________________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या