मुख्य डाकघर पनवेल येथे डाक अदालतीचे आयोजन
रायगड जिमाका दि.02: पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन, 2 रा माळा, पनवेल मुख्य डाकघर यांचे कार्यालयाद्वारे दिनांक 12.12.2024 रोजी, सकाळी ठीक 11.00 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.या डाक अदालतीमध्ये मुंबई रिजन विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार / समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अश्या टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बैंक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्छूक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन, 2 रा माळा, पनवेल मुख्य डाकघर 410206 यांचेकडे दिनांक 05.12.2024 पर्यंत पोहचेल अश्या रितीने पाठवावी.असे अवाहन अधीक्षक डाकघर, रायगड विभाग यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या