कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)परभणी जिल्ह्यात पोलिसी अत्याचारात शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी. आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते.याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दि.१२ डिसेंबर रोजी झालेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झाल्याबद्दल सि. आय. डी .मार्फत योग्यती चौकशी होवून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी.यासाठी मुरुडमध्ये बौद्ध समाज सेवा संघ (रजि.)तर्फे स्थानिक तालुका कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सुरेश मोरे व सचिव धर्मेश मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन देण्यात आले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,महाराष्ट्रात परभणी येथे दि.१० डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याबददल दोशी इसमावर योग्य ती कार्यवाही करून कठोर शिक्षा देण्यात यावी व दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सोमनाथ सुर्यवशी याचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यु झालेला आहे. या प्रकरणाची सि. आय.डी. मार्फत चौकशी करून संबंधीतावर उचित कार्यवाही करण्यात यावी.असे म्हटले आहे.
यावेळी बौद्ध समाज सेवा संघ (रजि.) स्थानिक तालुका कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सुरेश मोरे व सचिव धर्मेश मोरे, आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष ॲड.बबन शिंदे, उपाध्यक्ष विजय मोरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्याध्यक्ष वसंत मोरे, शाखा क्र.२ चे अध्यक्ष नरेंद्र जाधव,नरतम दाभणे, भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख मयूर मानकर
उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या