रायगड(जिमाका)दि.02:- जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या नियोजनानुसार जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.या प्रभातफेरीचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड ॲड.अमोल शिंदे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सौ.शितल जोशी-घुगे यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली.
या प्रभात फेरीकरिता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण शिंदे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.शितल स्वामी, डॉ.लायन्स क्लब श्रीबागच्या अध्यक्ष विजय वनगे, मेट्रन श्रीम. अनिता भोपी, नर्सिंग स्कुलच्या प्राचार्य सारिका पाटील, त्वचा व गुप्तरोग विभागाचे डॉ.सुयश वीरकर, जिल्हा क्षयरोग केंद्र अलिबाग यांचे प्रतिनिधी डॉ. अक्षयराज राठोड हे उपस्थित होते.
मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्फत 01 डिसेंबर ते 09 डिसेंबर जागतिक एड्स दिन व सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून दि. 02 डिसेंबर 2024 रोजी, सकाळी 9.00 वाजता प्रभात फेरीचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आले. Take the rights path ( टेक द राईट्स पाFk) या थीमवर आधारीत सदर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
ही प्रभातफेरी जिल्हा रुग्णालय या ठिकाणावरून सुरुवात करून एस. टी . स्टॅन्ड ते शिवाजी चौक, बालाजी नाका ते जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी संपविण्यातआली. या प्रभात फेरीत शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जे.एस.एम. कॉलेज, पी.एन.पी. कॉलेज, नर्सिंग स्कूलच्या विद्याथी विद्यार्थिनी सहभाग घेतला तसेच हातात फलक घेऊन व घोषवाक्य देऊन एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती केली.
यावेळी सकाळी 9.00 वाजता प्रभात फेरीच्या सुरुवातीला सन 2023-24 मध्ये आयसीटीसी ग्रेडींगनुसार उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आयसीटीसी कर्मचाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांक आयसीटीसी, उपजिल्हा रुग्णालय पेण, द्वितीय क्रमांक आयसीटीसी 02, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग तर तृतीय क्रमांक आयसीटीसी, उपजिल्हा रुग्णालय पनवेल याना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र व प्रोत्साहनपर काम केल्याबद्दल एआरटी केंद्र रिलायन्स हॉस्पिटल लोधीवली याना सन्मानपत्र देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्यानंतर अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सौ.शितल जोशी- घुगे यांनी प्रभातफेरीकरिता उपस्थित असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थींनी एचआयव्ही/एड्स संसर्गित असणाऱ्या व्यक्तींना कलंकित समजून भेदभाव करणार नाही. तसेच सदरची व्यक्ती मानवाधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेईन अशा आशयाची शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक. संजय माने यानी सदर वेळी 01 डिसेंबर जागतिक दिनाचे महत्व सांगून 01 डिसेंबर ते 09 डिसेबरमध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली.
प्रभात फेरीची सांगता झाल्यानंतर पी.एन.पी. महाविद्यालय, शासकीय महाविद्यालय अलिबाग येथील विद्यार्थी विद्यार्थींनी एचआयव्ही/एड्स विषयीमूलभूत माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्हीचा प्रतिबंध, एचआयव्ही संसर्गितांसाठी सेवा सुविधा एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासवर होणारा परिणाम, एचआयव्ही सदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी, एचआयव्ही कसा होता, काय केल्याने होत नाही, एचआयव्ही होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी याबाबत फ्लॅश मॉब द्वारे माहिती देण्यात आली.
सदरची प्रभातफेरी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात आल्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थींनीना सामाजिक बांधिलकीतून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्याकडून बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तर लायन्स क्लब श्रीबाग याच्याकडून बिस्कीट व पाणी वाटप करण्यात आले. त्यनंतर प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक राजेश किणी, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड ई सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर डापकु, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ.सुजाता तुळपुळे, श्री. अमित सोनवणे, समुपदेशक अर्चना जाधव, कल्पना गाडे, मोबाईल आयसीटीसी व्हॅन समुपदेशक रामेश्वर मुळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, वाहनचालक अतिश नाईक, क्लिनर श्री. रुपेश पाटील, वाहनचालक महेश घाडगे, क्लिनर मंगेश पिंगळा, एआरटी कर्मचारी समुपदेशक दीप्ती चव्हाण, अक्षय बेरड, डेटा मॅनेजर कोमल लोखंडे, स्टाफ नर्स पल्लवी पडवळ, औषधनिर्माती सायली म्हात्रे, आरबीएसके समन्वयक सुनील चव्हाण, आधार ट्रस्ट पनवेल च्या प्रतिनिधी सौ. जागृती गुंजाळ, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेण च्या प्रतिनिधी सौ. रुचिता म्हात्रे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिसेवीका, सहा.अधिसेवीका, नर्सिंग ऑफिसर, परीसेवीका, सार्व. आरोग्य परिचारिका, अधिपरिचारिका, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयांमधील व ओपीडीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिकलसेल समन्वयक प्रतिम सुतार यांनी केले तर व आभार प्रदर्शन संजय माने यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या