पत्रकार अजय शिवकर यांच्या मातोश्री गं .भा. अयोध्या गणेश शिवकर यांचे निधन
Raigad Maza Newsडिसेंबर ०३, २०२४0
उरण दि ३(: प्रसिद्ध लेखक, कवी, पत्रकार अजय शिवकर यांच्या मातोश्री गं .भा. अयोध्या गणेश शिवकर यांचे सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले... त्यांच्या पश्चात , मुले, मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे... त्यांचा अंत्यविधी केळवणे स्मशानभूमी येथे झाला...यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता... दशक्रिया विधी गुरुवार दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता उरण माणकेश्वर येथे होणार आहे तर उत्तरकार्य शुक्रवार १३ डिसेंबर रोजी राहत्या घरी होणार आहे.असे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे...गेले काही दिवस त्या आजारी असून घरीच उपचार घेत होत्या... मात्र सोमवारी सकाळी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल केले होते...मात्र बरे वाटते म्हणून घरी आणल्यावर संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला...त्यांच्या जाण्याने संपूर्ण शिवकर कुटुंब आणि नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे...
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या